Government Rule Saam Tv
बिझनेस

Government Rule: सरकारचा मोठा निर्णय! १८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी लागणार पालकांची परवानगी

Government Rule For Social Media Account: सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना सोशल मीडिया अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Siddhi Hande

सध्या सोशल मिडिया हे तरुणाईचे जग झाले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहेत. १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना सोशल मिडिया अकाउंट सुरु करण्यासाठी पालकांची संमती घेणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट ०२३३ च्या मसुद्याच्या नियमांमध्ये ही तरतूद समाविष्ट आहे. याबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजी मंत्रालयाने अधिसूचना जाहीर केली आहे. (Government Rule)

१८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल.मसुदा नियम कायद्यानुसार, मुल आणि अपंग व्यक्तीच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाय केले जाणार आहेत. त्यानुसार, डेटा फिड्युशियर्स म्हणजे वैयक्तिक डेटा हातळण्याची जबाबदारी आणि अल्पवयीन मुलांचा डेटा प्रक्रिया करण्यापूर्वी मुलांच्या पालकाची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी घेण्यासाठी पालकांनी सरकारी ओळखपत्र किंवा डिजिटल लॉकरचे टोकन वापरणे आवश्यक आहे. (Government Rule For Social Media)

मुलांच्या डेटावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. युजर्सला आपला डेटा हटवण्याचा आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांकडून पारदर्शकतेची मागणी करण्याचा अधिकार असेल. डेटाचे उल्लंघन केल्यावर २५० कोटी रुपयांना दंड भरावा लागू शकतो.

१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचा डेटा सुरक्षित राहावा, पालकाचे त्याकडे लक्ष असावे, या उद्देशाने हा नियम तयार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT