Government Job Saam Tv
बिझनेस

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल दीड लाख मिळणार पगार; असा करा अर्ज

Government Job News: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठात ८८ पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी खास संधी आहे. डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर या पदासांठी रिक्त जागा आहे. यासाठी भरती सुरु करण्यात आल्या आहेत. जवळपास ८८ जागा भरण्यात येणार आहे. याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या पदासांठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या पदांसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.

डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी भरती सुरु आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुणांसाह पदव्युतर पदवी प्राप्त केलेला असावा. याशिवाय उमेदवाराने UGC NET, SLET, SET किंवा CSIR NET परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय पीएचडी पदव्युतर उमेदवारी या नोकरीसाठी अर्ज करु शकता. या नोकरीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल.

या भरतीमध्ये एकूण ८८ जागा भरण्यात येणार आहे. स्कूल ऑफ बायोलॉजिस्ट सायन्स, स्कूल आणि इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ लँग्वेजेस, स्कूल ऑफ अप्लाइड सायन्स, स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ आर्ट्स अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस आणि स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या पदासांठी ही भरती करण्यात येणार ईहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ओबीसी, EWS आणि सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी १ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST, PH आणि महिला उमेदवारांना ५०० रुपये फी भरावे लागणार आहे.

पगार

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन लेव्हल १० नुसार दरमहा वेतन दिले जाईल. यानुसार उमेदवारांना ५७७०० ते १८२४०० रुपये वेतन मिळू शकते.

अर्ज कसा करायचा

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही CU सिलेक्शन पोर्टल curec.samarth.ac.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर तिथे भरती किंवा करिअर विभागात जा. त्यानंतर रिक्त पदाची लिंक ओपन करा. त्यात तुम्ही अर्ज करु शकता. यासाठी अधिक माहिती dhsgsu.edu.in या वेबसाइटवर दिलेली आहे.

ऑफलाइन अर्ज

या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला तुमचे कागदपत्र आणि पात्रतेची हार्ड कॉपी विद्यापीठाच्या पत्त्यावर पोहचवावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Stomach Care: हिवाळ्यात पोटदुखी का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे आणि प्रभावी उपाय

चॅट्स- व्हिडिओ बघितले, चुपके-चुपकेवालं अफेअर समजलं; बँकेत मॅनेजर असलेल्या नवऱ्याला बायकोनं तुडव तुडव तुडवलं

Goa Film Festival: गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाचा डंका, 'या' दोन चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

Shepuchi Bhaji Recipe: मुगाची डाळ घालून बनवा शेपूची भाजी; नाक मुरडणारे पण चवीचवीनं खातील

Skin Care: हिवाळ्यात चेहरा साबणने धुण्याची सवय आहे? मग, होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT