Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: महागाईचा भडका! पेट्रोल डिझेवरील एक्साइज ड्युटी वाढली; सिलिंडरच्या दराचाही स्फोट

Petrol Diesel Price Hike Today: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल डिझेलवरील एक्साइज ड्युटीमध्ये २ रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार आहेत.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोमवारी एकीकडे शेअर मार्केट पडले आहे तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. भारत सरकारने पेट्रोल डिझेलवर लागणाऱ्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ केली आहे. सरकारने पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर २ रुपयांनी एक्साइज ड्युटी वाढवली आहे.पेट्रोल डिझेलच्या एक्साइज ड्युटीवर लावले असले तरी याचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाहीये. पेट्रोल डिझेलचे दर हे बदलणार नाहीत.

काल घरगुती गॅस सिलिंडरच्याही किंमतीत वाढ झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

सरकारने याबाबत माहिती दिली आहे. एक्साइज ड्युटीमधील वाढीचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही. एक्साइज ड्युटी हा केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलवर लावला जाणारा चॅक्स आहे. यामुळे पेट्रोलच्या एक्साइज ड्युटीत १३ रुपयांनी तर डिझेलच्या एक्साइज ड्युटीत १० रुपयांनी वाढ झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होणार आहे.

देशातील पेट्रोल डिझेलच्या भावात बदल नाही (Petrol Diesel Price Today In India)

मुंबई (Mumbai)

पेट्रोल १०३.५० रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये/ प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल ९४.७७ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ८७.६७ रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल १०५.०१ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.८२ रुपये/ प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.८० रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९२.३९ रुपये/ प्रति लिटर

राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price In Maharashtra)

पुणे (Pune)

पेट्रोल १०३.९९ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.२४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.७७ रुपये/ प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.०२ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.५८ रुपये/ प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०३.७० रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.२२ रुपये/ प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.८८ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.४२ रुपये/ प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.२५ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.७४ रुपये/ प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT