Double Gratuity Saam tv
बिझनेस

Double Gratuity: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार डबल ग्रॅच्युटी; वाचा NPS चा नियम काय सांगतो

Double Gratuity for Government Employees Rules: सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीबाबत ऑफिस मेमोरँडमन जारी केले आहे. यानुसार आता ग्रॅच्युटीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांना डबल ग्रॅच्युटी

ग्रॅच्युटीचे नियम काय सांगतात?

दोन ठिकाणी काम केल्यावर मिळते डबल ग्रॅच्युटी

केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारने डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरने नॅशनल पेन्शन सिस्टीमअंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीबाबत ऑफिस मेमोरेंडम जारी केले आहे. यामध्ये सांगितले की,ग्रॅच्युटीमध्ये मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमधील गोंधळ दूर होण्यास मदत होणार आहे.

ग्रॅच्युटी नियम 4A काय सांगतो?

ऑफिस मेमोरँडमनसार,सीसीएस सुधारणा नियम २०२५ च्या नियम 4Aनुसार, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने केंद्र सरकार आणि सार्वजनिक उपक्रमात किंवा एखाद्या स्वायत्ता संस्थेत दोन्ही ठिकाणी काम केले असेल तर त्यांना दोन्ही ठिकाणाहून ग्रॅच्युटी मिळते. अशा परिस्थितीमध्ये आता ग्रॅच्युटीवर मर्यादा लागू केली जाईल.

सरकारी नोकरीमध्ये नियुक्तीचे नियम (Governnent Employees Gratuity Rules)

जर एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर किंवा ग्रॅच्युटी मिळाल्यानंतर पुन्हा सरकारी नोकरीत नियुक्त केले असेल तर त्यांना त्या कालावधीसाठी वेगळी ग्रॅच्युटी मिळणार नाहीये. मंत्र्यालयाच्या ओएममध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याला आधीच ग्रॅच्युटी मिळाली असेल तर त्याला नवीन ग्रॅच्युटी मिळणार नाही.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हे जर केंद्र सरकारी सेवेत सहभागी झाले असेल तर त्या सरकारी सेवेसाठी ग्रॅज्युटी मिळेल. याचसोबत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्थेकडून मिळणारी ग्रॅच्युटीदेखील मिळणार आहे. या दोघांकडून मिळणारी ग्रॅच्युटी पगाराच्या आधारावर देय रक्कमेपेक्षा कमी असू शकत नाही.

ग्रॅच्युटीचे नियम सोपे

सरकारच्या या नवीन नियमानुसार हजारो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी संस्थेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना सीसीटीव्हीत कैद

Nerul Tourism: कमी गर्दीत फिरायचंय? नेरुळजवळील ‘हे’ 9 सीक्रेट पिकनिक स्पॉट्स ठरतील एकदम बेस्ट

Tea Price Increase: चहाप्रेमींसाठी वाईट बातमी! चहाचा एक कप महागला, ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या संपर्कातील तो लोकप्रतिनिधी कोण? गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

आरोग्य विम्याचे नवे नियम! उपचारासाठी १ तासात मंजुरी द्यावी लागणार, तर फायनल सेटलमेंटसाठी ३ तासांची मुदत

SCROLL FOR NEXT