Toll Tax New Rules : राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, सरकराने टोल टॅक्सच्या नियमात बदल केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना ७० टक्क्यांपर्यंत टोल टॅक्समध्ये सूट मिळू शकते. NHI नव्या नियमानुसार दोन लेनच्या राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू असल्यास ७० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्सच्या फक्त ३० टक्के भरावा लागेल.
रिपोर्ट्सनुसार, देशभरात २५,००० ते ३०,००० किलोमीटर लांबीचे २ लेन महामार्ग ४ लेन महामार्गांमध्ये श्रेणी सुधारित केले जाणार आहेत. त्यासाठी अंदाजे १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या नवीन नियमानुसार, दोन लेनच्या राष्ट्रीय महामार्गाचे चार लेन किंवा त्याहून अधिक रुंदीकरण सुरू असल्यास वाहनचालकांकडून पूर्ण टोल कर आकारला जाणार नाही. या महामार्गावर ७० टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.
नव्या नियमांनुसार, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झालेलया तारखेपासून ते पूर्ण होऊपर्यंत कोणत्याही वाहनधारकांकडून पूर्ण टोल घेतला जाणार नाही. फक्त ३० टक्क्यांची रक्कमच घेतली जाणार आहे. रस्त्याचे काम सुरू असताना टोलच्या दरात ७० टक्क्यांची सूट मिळणार आहे. NHAI प्रत्येकवर्षी सात ते १० टक्क्यांची वाढ करत असते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या वर्षांपासून ही सुधारणार करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ७० टक्क्यांच्या सूटचा नियम सध्या काम सुरू असलेल्या आणि काम सुरू होणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गासाठी लागू करण्यात आला आहे.
चार पदरी महामार्गांवर २५% सूट
NHI नव्या नियमानुसार, राष्ट्रीय महामार्ग चार लेनवरून सहा किंवा आठ लेनमध्ये अपग्रेड केला जात असेल तर टोल करात २५ टक्के सूट दिली जाणार आहे. म्हणजेच, ठरलेल्या टोल कराच्या ७५ टक्के रक्कम भरावी लागेल. त्याशिवाय टोल रोडचा खर्च भरल्यानंतर फक्त ४० टक्के टोल कराची आकारणी केली जाईल असा आधीच नियम आहे.
२५-३० हजार किमीवर काम सुरू आहे.
नव्या सरकारी आकडेवारीनुसार देशभरात सध्या २५,००० ते ३०,००० किलोमीटर लांबीचे दोन-लेन महामार्ग चार-लेन महामार्गांमध्ये अपग्रे़ड केले जात आहे. या कामासाठी सरकारला १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील मालवाहतुकीचा वाटा ४० टक्के आहे. हा ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ४ लेन कॉरिडॉरच्या बांधकामामुळे व्यावसायिक वाहनांचा सरासरी वेग ताशी ३०-३५ किमी वरून ५० किमी प्रति तासापेक्षा जास्त होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.