General Provident Fund Saam Tv
बिझनेस

PF Interest News: सरकारकडून जनरल पीएफच्या व्याजदराची घोषणा; डिसेंबरच्या तिमाहीसाठी किती मिळेल Interest?

General Provident Fund : केंद्र सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निधी (जीपीएफ)च्या व्याजदराची घोषणा केलीय.

Bharat Jadhav

What is General Provident Fund :

केंद्र सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निधी (जीपीएफ)च्या व्याजदराची घोषणा केलीय. अर्थ मंत्रालयानं या निधींचे म्हणजेच फंड्सचे व्याजदर परत एकदा कायम ठेवले आहेत. केंद्रानं सलग १६ व्या तिमाहीत व्याज दर वाढवले नाहीत. सामान्य भविष्य निधी आणि इतर प्रोव्हिडेंट फंडच्या व्याजदरात कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. या फंडसाठी ७.१ टक्के व्याज कायम ठेवण्यात आलेत. हे व्याजदर जुलै महिन्यापासून लागू होणार आहेत. (Latest News)

इतर सरकारी भविष्य निर्वाह निधीसह राज्य रेल्वे निधी, अंशदायी भविष्य निर्वाह निधी, सशस्त्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधीच्या व्याजात कोणताही बदल झालेला नाही. याची माहिती अर्थ मंत्रालयानं आज दिलीय. जनरल प्रोव्हिडेंट फंड आणि इतर निधींसाठी ७.१ टक्के हे व्याजदर १ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबरसाठी लागू असेल. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीसाठी जीपीएफचं व्याजदार निश्चित करत असते. याआधी हे व्याजदर जुलै-सप्टेंबर २०२३-२४ च्या तिमाहीत निश्चित करण्यात आले होते.

काय आहे जनरल पीएफ ( जनरल पब्लिक फंड)

जनरल भविष्य निधी (जीपीएफ) फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो. जीपीएफ केंद्र सरकारची एक सोशल सिक्योरिटी योजना आहे. जीपीएफनुसार, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनाचा काही टक्के भाग सामान्य भविष्य निधीमध्ये द्यावा लागतो. यामुळे नोकरी चालू असेपर्यंत ही रक्कम जमा केली जाते आणि नोकरीच्या अखेरीस ही रक्कम दिली जाते. अर्थमंत्रालय प्रत्येक तिमाहीत जीपीएफचं व्याजदर निश्चित करत असते.

या फंड्ससाठी लागू असेल ७.१ टक्के व्याज

  • सामान्य भविष्य निधी (जीपीएफ) General Provident Fund for Central Service.

  • सामान्य भविष्य निधी (जीपीएफ) General Provident Fund for Defence Services

  • अंशदायी भविष्य निधी (सीपीएफ) Contributory Provident Fund.

  • अखिल भारतीय सेवा भविष्य निधी (एआईएसपीएफ) All India Services Provident Fund.

  • राज्य रेल्वे भविष्य निधी (एसआरपीएफ) State Railway Provident Fund.

  • भारतीय आयुध विभाग भविष्य निधी (एएफपीपीएफ) Armed Forces Personnel Provident.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT