सेंट्रल बोर्ड ऑफ डारेक्ट टॅक्सने कॉरपोरेट्ससाठी एक असेसमेंट इअर २०२४-२५ साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मर्यादा वाढवलीय. जर मर्यादा वाढवण्यात आली नसती तर व्यावसाय आणि रिटर्न भरण्याची टेन्शन वाढलं असतं. दरम्यान इनकम टॅक्स रिटर्नबाबत काय नियम आहे, ते जाणून घेऊ.
व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने कॉरपोरेट्ससाठी असेसमेंट इअर २०२४-२५ साठी मर्यादा वाढवण्यात आलीय. कॉरपोरेट्स लोकांना आता १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. आधीही ही मुदत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत होती. त्यात आता वाढ करण्यात आलीय.
सरकारने म्हटले आहे की, हा विस्तार प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम १३९ च्या उप-कलम (1) अंतर्गत समाविष्ट असलेल्या करदात्यांना लागू होतो. विशेष रुपाने हा विस्तार सरकारद्वारे टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची मर्यादा ३० सप्टेंबर २०२४ हुन ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
इनकम टॅक्स कायद्यानुसार काही करदात्यांना इनकम टॅक्स ऑडिट करावं लागतं. तसेच असेसमेंट इअरच्या ३० सप्टेंबरपर्यंत रिपोर्ट जमा करावी लागते. नांगिया अंडरसन एलएलपी टॅक्स पार्टनर संदीप झुनझूनवाला यांनी सांगितलं की. टॅक्स ऑडिट रिपोर्ट, फॉर्म ३CEB आणि फॉर्म १० डीए मधील ट्रान्सफर प्राइसिंग सर्टिफिकेशन यांसारख्या इतर आयकर फॉर्मवर हा विस्तार लागू होणार नाही, ज्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 राहील.
दरम्यान इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढल्याची माहिती अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाहीये. परंतु सरकार दिवाळीच्या दिवसात व्यापारात गुंतलेल्या व्यापाऱ्यांचं टेन्शन कमी करण्याचा विचार करेल. त्यामुळे व्यापाऱ्यांचं टेन्शन कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.