Employee Layoff update  Saam tv
बिझनेस

Employee Layoff : नोकरी सांभाळा! TCSनंतर आणखी एका बड्या कंपनीत नोकर कपात; अनेकांना नोटीस न देताच कामावरून काढलं

Employee Layoff update : TCSनंतर आणखी एका बड्या कंपनीत नोकर कपात करण्यात आलीये. अनेकांना नोटीस न देताच कामावरून काढण्यात आल्याचं समोर आलंय.

Vishal Gangurde

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)नंतर मोठी टेक कंपनी गुगल (Google)मध्येही नोकर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपनीने क्लाऊड डिव्हिजनमधून १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनी आता ऑपरेटिंग कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला (AI) अधिक प्राधान्य दिलं जात आहे. कंपनीने काढलेल्या कर्मचारी हे डिझाइन आणि यूजर एक्सपीरियन्स रिसर्च विभागात काम करत होते. त्यांच्यावर प्रॉडक्ट रिसर्च, यूजर डेटाचं विश्लेषण करणे आणि नव्या सुविधांचा विकास करणे याची जबाबदारी होती.

गुगल कंपनीचा क्लाऊड डिव्हिजन चांगली नफा मिळवत आहे. या वर्षीच्या २०२५ सालच्या दुसऱ्या तिमाहीत गुगल क्लाउडची कमाई १३.६ अब्ज डॉलर राहिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३२ टक्के कमाई अधिकची झाली आहे. या डिव्हिजन ऑपरेटिंग नफा वाढून २.८ अब्ज डॉलर इतका पोहोचला आहे.

कंपनीने आता खर्च कमी करणे आणि संसाधनाच्या पुनर्वाटपावर लक्ष केंद्रीत केलं आहे. गुगलने एआय केंद्रीत धोरणाचा भाग नसलेले विभाग कमी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कंपनी जुन्या कामाच्या जुन्या कामाच्या पद्धतींपासून एआय आणि नवीन तंत्रज्ञानावर जबाबदाऱ्यांकडे वळत आहे.

गुगलचा एआयकडे कल वाढला

गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला प्राधान्य दिलं आहे. यासाठी कंपनीने यूएस आधारित यूनिट्समधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती पॅकेजेस देण्यात सुरुवात केलीये. या व्यतिरिक्त मॅनेजमेंटमधील एक तृतीयांश कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पाडली आहे. रिपोर्टनुसार, काही कर्मचाऱ्यांना इतर टीममध्ये ट्रान्सफर करण्याचा पर्याय सुचवला आहे. तर काही जणांना थेट राजीनान्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याची कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. त्यांना इतरत्र तयारीसाठी कोणताही वेळ मिळाला नाही. एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, 'तो अमेरिकेत ०-१ व्हिसावर काम करत होता. या व्हिसावर फक्त ६० दिवसांत दुसरी नोकरी शोधावी लागते किंवा अमेरिका सोडावी लागते.

कंपनीने काही कर्मचाऱ्यांना इतर विभागांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी डिसेंबरच्या सुरुवातीचा आठवड्याची मुदत दिली आहे. या प्रकरानंतर कंपनीच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर टीका केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting Controversy: शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळात खडाजंगी|VIDEO

Gondhal Movie: 'आमचा ट्रेलर बघू नका...'; 'गोंधळ' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दिग्दर्शकाचं विचित्र आवाहन, कारण सांगत म्हणाला...

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश

Maharashtra Live News Update: पावसामुळे जलक्रीडा बंद असल्याने राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

Cyclone Alert : 'मेंथा'चं रौद्र रूप, चक्रीवादळामुळे आंध्रात रेड अलर्ट, महाराष्ट्र सतर्क, IMD ने काय दिला अलर्ट

SCROLL FOR NEXT