Central Government Employees meta ai
बिझनेस

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

Workers Salary: महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीत वाढ झाली आहे. १ ऑक्टोबरपासून नवीन दर लागू झाले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

ऐन सणासुदीत लाखो कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे. केंद्र सरकारने कृषी, बांधकाम, देखभाल तसेच रस्ते आणि इमारतींशी संबंधित कामांमध्ये कार्यरत कामगारांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. ही वाढ १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाली आहे. महागाई भत्त्यातल्या वाढीमुळे वेगवेगळ्या श्रेणीतल्या कामगारांच्या बेसिक सॅलरीत वाढ झाली आहे.

कामगारांचं वेतन त्यांच्या कौशल्याच्या पातळीबरोबरच एरिया A, B आणि C या क्षेत्रांनुसार निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळी बेसिक सॅलरी मिळणार आहे.

कृषी क्षेत्रातल्या कामगारांना किती सॅलरी?

कृषी क्षेत्रात एरिया A मधल्या अकुशल कामगारांना आता दररोज ५३७ रुपये मिळतील. यामध्ये ३३३ रुपये मूळ सॅलरी आणि २०२४ रुपये महागाई भत्त्याचा समावेश असेल. याच क्षेत्रातल्या अतिशय कुशल कामगारांसाठी बेसिक सॅलरी ७०५ रुपये प्रतिदिन करण्यात आली आहे. एरिया B मध्ये अकुशल कामगारांना ४९१ रुपये, तर एरिया C मध्ये ४८६ रुपये प्रतिदिन बेसिक सॅलरी मिळेल.

बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांनाही दिलासा

बांधकाम आणि देखभाल क्षेत्रातल्या कामगारांसाठीही नवीन दर लागू झाले आहेत. रस्ते, रनवे, इमारती, वीज व कम्युनिकेशनच्या भूमिगत केबल्स, पाणी पाइपलाइन आणि सीवर लाइन यांसारख्या कामांचा यामध्ये समावेश आहे.

एरिया A मधील अकुशल बांधकाम कामगारांची बेसिक सॅलरी ८४० रुपये प्रतिदिन, तर अतिशय कुशल कामगारांची सॅलरी १,१११ रुपये झाले आहे. एरिया B मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ७०४ आणि १,२४ रुपये, तर एरिया C मध्ये ५६५ आणि ९३३ रुपये प्रतिदिन आहे.

महागाई भत्ता का वाढवला?

महागाई भत्ता हा वाढत्या जीवनावश्यक खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी वेतनात दिला जाणारा घटक आहे. सरकार औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI-IW) आधारित त्याचे पुनरावलोकन करते. यावेळी निर्देशांक ४२४.८० वरून ४३१.४२ झाला असून, ६.६२ अंकांची वाढ झाल्याच्या आधारावर १ ऑक्टोबरपासून सुधारित महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT