Mahila Sanman Saving Certificate Saam Tv
बिझनेस

Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांना मिळणार मोठा दिलासा! महिला सन्मान योजनेत गुंतवणूकीला मुदतवाढ देण्याची शक्यता

Budget 2025 Expectation For Women: बजेटमध्ये महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात महिला सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत मुदतवाढ दिली जाऊ शकते.

Siddhi Hande

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकरी, महिला, करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी खास घोषणा होऊ शकते. महिलांसाठी केंद्र सरकारने महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना राबवली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख मार्च २०२५ आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत वाढवू शकतात.

महिला सन्मन सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूकीवर चांगले व्याज मिळते. या योजनेत अजूनही अनेक महिलांना गुंतवणूक करायची आहे.त्यामुळे कदाचित गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवू शकते.

महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत कमीत कमी १००० रुपये तर जास्तीत २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड २ वर्षांचा आहे. या योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो.

या योजनेत तुम्ही २ लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षात २.३२ लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. या योजनेत तिमाही आधारावर बँक खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेत फक्त महिलाच अर्ज करु शकतात.

या योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठा निर्णय होऊ शकतो. या योजनेत जर मुदतवाढ केली तर महिलांना दिलासा मिळणार आहे.या योजनेत तुम्ही एकदा खाते उघडल्यावर ६ महिन्यांनी बंद करु शकतात. परंतु त्यावर तुम्हाला २ टक्के कमी व्याज मिळणार आहे. या योजनेत खाते उघडल्यानंतर १ वर्षांनी ४० टक्के रक्कम काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT