केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रिय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. (DA Hike)
वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. एकदा मार्चमध्ये तर दुसऱ्यांदा ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्याच वाढ केली जाते. हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मार्च २०२५ पासून होणार आहे. सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कर्मचारी संघटनांच्या मते, या वर्षी ३ ते ४ टक्के महागाई भत्ता वाढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात ५४० ते ७२० रुपये वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. त्यांना सध्या ५० टक्के महागाई भत्ता मिळतो. म्हणजेच त्यांना ९००० रुपये महागाई भत्ता मिळत आहे. आता याच महागाई भत्त्यात अजून वाढ होणार आहे.
जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर महागाई भत्ता ९,५४० रुपये मिळणार आहे. ५४० रुपयांनी वाढ होणार आहे. जर ४ टक्के वाढ झाली तर ९७२० रुपये मिळणार आहेत.
महागाई भत्ता हा पेन्शनधारकांनाही मिळतो. १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे.याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये ३ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला होता. त्यामुळे महागाई भत्ता ५३ टक्के झाला होता. मार्च २०२४ मध्ये महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला होता. महागाई भत्त्याबाबत मोठी घोषणा पुढच्या महिन्यात होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.