DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या तारखेला वाढणार महागाई भत्ता; मोठी घोषणा होण्याची शक्यता

DA Hike For Central Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे.
DA Hike For Central Government Employees
DA HikeSaam Tv
Published On

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. आठवा वेतन आयोग २०२६ पासून लागू केला जाईल. दरम्यान, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकार केंद्रिय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. (DA Hike)

DA Hike For Central Government Employees
Post Office Scheme: या सरकारी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला ९२५० रुपये मिळवा; कसं? जाणून घ्या सविस्तर

सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, यावेळी सरकार केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करु शकते. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू केलेली असणार आहे.

मागील वर्षीदेखील जानेवारी महिन्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरु केली होती. त्यामुळे यावर्षीदेखील यामहिन्याअखेर मोठी घोषणा होऊ शकते. याचसोबत सरकार होळीनंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करु शकते.सरकार वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढवते. १ जानेवारी आणि १ जुलै अशा दोन वेळेला सरकार महागाई भत्ता वाढवते. (DA Hike Announcement)

मागच्या वेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात महागाई भत्ता वाढवला होता. मात्र, हा महागाई भत्ता १ जुलैपासून लागू करण्यात आला होती. सरकारने तेव्हा ३ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला होता. यावेळी सरकार ३ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकतात. जर सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला तर तो ५६ टक्के होईल.

सरकार होळीच्या आधी महागाई भत्ता वाढवू शकते. होळी १४ मार्चला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढू शकते.

DA Hike For Central Government Employees
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? अर्थमंत्री अर्थसंकल्पात करु शकतात मोठी घोषणा

कोविडच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना तो महागाई भत्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, याबाबत सध्या तरी कोणतीही घोषणा होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

DA Hike For Central Government Employees
PF interest Rate: खुशखबर! PF खात्यावरील व्याजदर वाढण्याची शक्यता; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com