Google Android New Features Saam Tv
बिझनेस

Google ने दिली आनंदाची बातमी! आता Android फोनमध्ये मिळणार 4 नवीन फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Google Android New Features:

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2024 टेक इव्हेंटमध्ये Google ने नवीन Android फीचर्सची घोषणा केली आहे. हे फीचर्स लवकरच Android युजर्सला त्यांच्या डिव्‍हाइसमध्‍ये पाहायला मिळणार आहेत. हे फीचर्स फक्त मोबाईलमध्ये नाही तर, स्‍मार्ट टीव्‍ही, स्‍मार्ट होम अ‍ॅक्सेसरीजमध्ये ही देण्यात येणार आहेत. Google ने Samsung सह भागीदारीत Nearby Share फीचर्सचे रिब्रँडिंग केले आहे. कोणते आहेत हे नवीन Android फीचर्स? याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Quick Share

अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये मोठ्या फाइल्स शेअर करण्यासाठी आत्तापर्यंत युजर्स Nearby Share फीचरची मदत घेत होते. ज्याचे नाव आता बदलून Quick Share करण्यात आले आहे. या रिब्रँडिंगसाठी कंपनीने सॅमसंगसोबत भागीदारी केली आहे. लॅपटॉप आणि विंडोज पीसी मॉडेल्स क्विक शेअरसह अँड्रॉइड डिव्हाइसशी देखील कनेक्ट केले जाऊ शकतात. अपडेटेड लोगोसह Quick Share पुढील महिन्यात ग्राहकांना वापरता येऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Smart TVs मध्ये करता येईल Fast Pair

Android किंवा Google TV ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित स्मार्ट टीव्ही आता फास्ट कनेक्ट करता येतील. युजर्स त्याचे वायरलेस इयरबड्स Google TV OS सह डिस्प्लेशी सहजपणे कनेक्ट करू शकतील.  (Latest Marathi News)

जबरदस्त स्क्रीन कास्टिंग क्षमता

निवडक बाजारपेठांमध्ये युजर्सला एका क्लिकवर स्मार्ट टीव्हीवर अँड्रॉइड स्मार्टफोनवरून थेट लहान व्हिडिओ पाहण्याचा पर्याय दिला जात आहे. याशिवाय LG, HiSense आणि TCL सारख्या ब्रँडच्या Google TV मध्ये जबरदस्त स्क्रीन कास्टिंगचा पर्याय उपलब्ध होऊ लागला आहे. बिल्ट-इन क्रोमकास्टसह येणाऱ्या टीव्ही मॉडेलमध्ये हे फीचर्स लवकरच उपलब्ध होईल.

Android Auto मध्ये नवीन पर्याय

Google TV OS चालवणार्‍या टीव्ही मॉडेल्सव्यतिरिक्त Android डिव्हाइस देखील Android Auto शी कनेक्ट केले जाऊ शकतात. अशा प्रकारे जुर्स त्यांच्या कारमध्ये Google नकाशे व्यतिरिक्त मल्टीमीडिया कंटेंट अ‍ॅक्सेस करू शकतात. नवीन फीचर्सच्य लिस्टमध्ये EV साठी रिअल-टाइम बॅटरी इन्फो, बॅटरी लेव्हल, जवळचे चार्जिंग पॉइंट आणि चार्जिंग वेळ यासारख्या माहितीचा समावेश असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

SCROLL FOR NEXT