Gold Prices Fall saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी खुशखबर; सोन्याच्या किमती घसरल्या, पाहा तुमच्या शहरातील भाव

Today's Gold Rate: लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने या काळात बाजारात सोन्याच्या खरेदीला मोठी मागणी असते. नव्या आठवड्याची सुरुवात झाली असून सोनं घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती वधारल्याचं दिसून येतंय. मात्र गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याची किमती घसरल्या होत्या. सध्या लग्नाचा सिझन असून या काळात मोठ्या प्रमाणात बाजारातून सोन्याची खरेदी केली जाते. आज नव्या आठवड्याची सुरुवात असून आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत आज घसरण झाली आहे.

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २४ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,97,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,230 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,840 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,300 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,23,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,97,700 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,770 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 71,816 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,977 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,215 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,962 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,218 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,965 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,218 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,965 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,218 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,965 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

Laxman Hake: ओबीसींच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन|VIDEO

Money Plant: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

Raigad Crime News : अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गर्भवती असल्याचं कळताच बालविवाह; रायगडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT