Apple iPhone Models Price Reduced Saam Tv
बिझनेस

Apple लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने iPhone च्या Pro मॉडेलच्या किंमतीत पहिल्यांदाच केली मोठी कपात

Apple iPhone Models Price Reduced: नवीन iPhone 16 लाइनअप लॉन्च होण्याआधी Apple ने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या iPhone पोर्टफोलिओची किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी केली आहे. म्हणजेच आता ग्राहकांची प्रो मॉडेल्सवर 5,100 ते 6000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

साम टिव्ही ब्युरो

आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपलने आपल्या सर्व आयफोन मॉडेल्सच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, नवीन iPhone 16 लाइनअप लॉन्च होण्याआधी Apple ने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या iPhone पोर्टफोलिओची किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी केली आहे. म्हणजेच आता ग्राहकांची प्रो मॉडेल्सवर 5,100 ते 6000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

अॅपलने भारतात पहिल्यांदा प्रो मॉडेल स्वस्त केले आहेत. याशिवाय, मेड-इन-इंडिया iPhones च्या किमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे. यात iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 15 इत्यादींचा समावेश आहे. यांची किंमत 3,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

याशिवाय ग्राहकांना iPhone SE मॉडेल देखील पूर्वीपेक्षा 2,300 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येईल. म्हणजेच एक-दोन नव्हे, तर सध्याच्या सर्व आयफोन मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

प्रो मॉडेल्सच्या किंमतीत पहिल्यांदाच कपात

अॅपलने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडेल्सच्या किमतीत कपात केल्याचे, बोललं जात आहे. याआधी नवीन प्रो मॉडेल्स लॉन्च केल्यानंतर कंपनीने जुन्या प्रो मॉडेल्सवर मोठी सूट दिली आहे. याशिवाय डीलर्स आणि रिसेलर्स विविध सवलती देऊन जुना स्टॉक क्लिअर करतात.

दरम्यान, भारत सरकारने आपल्या बजेटमध्ये मोबाईल फोनवरील कस्टम ड्युटीमध्ये बदल केले असून त्यात 5 टक्के कपात केली आहे. आता मोबाईल कंपन्यांना 20 टक्क्यांऐवजी 15 टक्के बेसिक कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे. तेव्हापासून स्मार्टफोनच्या किमतीत कपात होऊन फोन स्वस्त होतील, अशी चर्चा होती. यातच अॅपल आपल्या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT