Pension Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: ६५ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक पेन्शन ९००० हून २५,७४० होणार

Pension Increases Under 8th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन २५,७४० होऊ शकते.

Siddhi Hande

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ८ वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग लागू होऊ शकतो.

८ व्या वेतन आयोगामुळे १ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, यावेळी फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे.यामुळे पेन्शन वाढू शकते. सध्या बेसिक पेन्शन ही ९,००० रुपये आहे. ही पेन्शन वाढवून मिळणार आहे. ही पेन्शन २५,७४० रुपये होण्याची शक्यता आहे. (8th Pay Commission)

७ वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन ९००० रुपये झाली होती. जास्तीत जास्त १,२५,००० रुपये पेन्शन होती. याचसोबत त्यांना महागाई भत्ता दिला जायचा.आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

पेन्शन आणि पगारात वाढ ही फिटमेंट फॅक्टरमध्ये घेतली जाते. सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर होता. ज्यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहेत.त्यानंरृतर आता २.८६ फिटमेंट फॅक्टर होऊ शकतो.त्यामुळे पेन्शमध्ये वाढ होऊ शकतो. त्यामुळे बेसिक पेन्शन २५,७४० रुपये होऊ शकते. जी १८६ टक्के वाढ असेल. (Pension Will Increase Under 8th Pay Commission)

८ व्या वेतन आयोगात इतर अनेक लाभांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये महागाई भत्त्यातदेखील बदल होऊ शकतो. ज्यामध्ये ग्रॅच्युटी वाढण्याची शक्यता आहे. पेन्शन मध्ये वाढ झाल्यानंतर महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२६ मध्ये ही पेन्शन वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

SCROLL FOR NEXT