२१ हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार
नवीन कामगार कायद्यानुसार जास्त बोनस मिळणार
कर्मचाऱ्यांना किमान ८.३३ टक्के बोनस मिळणार
कर्मचाऱ्यांना कमाल २० टक्के बोनस मिळण्याचा नियम
२१ हजार पगाराच्या कर्मचाऱ्यांची बोनससाठी पात्रता
आता बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या फायद्याची. 21 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस मिळणार आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात मोठी घोषणा केलीय. नव्या कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांच्या फायद्याचं आणखी काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...
आता देशातल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं नव्या कामगार कायद्यांतर्गत मोठी घोषणा केलीये. दर महिना 21 हजारांपर्यंत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस मिळणार आहे. बोनसची पात्रता आणि गणनेसंदर्भात सरकारकडून महत्त्वाची अधिसूचना जारी करण्यात आलीय. मात्र, बोनस मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला वर्षातून किमान 30 दिवस काम करणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, नव्या कामगार कायद्यानुसार, बोनसची गणना कशाच्या आधारे केली जाणार आहे? आणि त्याचं स्वरुप नेमकं कसं असणार आहे? ते एकदा पाहूयात...
पात्र कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक बोनस त्यांच्या पगाराच्या किमान 8.33% आणि कमाल 20% असेल. बोनस दरमहा 7 हजार किंवा लागू किमान वेतनापैकी जी रक्कम जास्त असेल त्यावर आधारित असेल. नवीन कामगार कायद्यानुसार बोनसची गणना 10 हजारांच्या आधारावर करणार आहे. किमान पगार X 8.33% X 12 हे सूत्र वार्षिक बोनससाठी लागू असेल. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 8 महिन्यांच्या आत बँक खात्यात बोनस जमा करणं बंधनकारक असेल. विशेष म्हणजे, या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कंपन्यांना मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. मात्र, देशात नोकरदारवर्गाला मिळणाऱ्या बोनसची सद्यस्थिती काय आहे, यावर तज्ज्ञांनी मत मांडले आहे.
नव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेनुसार, किमान 12 हजार रुपये मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षाला किमान 11,995 रुपये बोनस मिळण्याची शक्यता आहे. खरंतर, अनेक खासगी कंपन्यांमध्ये कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीवरून वाद होतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कायदेशीर बोनस मिळवून देणाऱ्या नव्या अधिसूचनेची योग्य अंमलबजावणी होणार का? याकडे नोकरदारवर्गाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.