Gold and silver prices witnessed a sharp correction in the Jalgaon bullion market after touching record highs. Saam Tv
बिझनेस

Gold And Silver Rate : २४ तासांत सर्वात मोठी घसरण! सोनं ₹३०००० तर चांदी १ लाखांनी घसरली, नाता सुवर्णनगरीतील ताजे दर

Gold And Silver Prices Fall After Record High: जळगाव सुवर्ण बाजारात ऐतिहासिक उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं दोन दिवसांत २० हजारांनी तर चांदी एक लाखांनी स्वस्त झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

Omkar Sonawane

सोन्या–चांदीच्या दरात मागील दोन दिवसांत मोठी घट झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. जळगाव सुवर्ण बाजारात गुरुवारी (ता. २९) सोने आणि चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर लगेचच दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

गुरुवारी चांदीचा दर ‘जीएसटी’सह प्रतिकिलो 4 लाख रुपयांच्या पुढे गेला होता, तर सोने प्रतिदहा ग्रॅम 1 लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचले होते. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात होता. मात्र शुक्रवारी (ता. ३०) चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल ४२ हजारांची, तर सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम ९ हजारांची घट झाली.

शनिवारी (ता. ३१) बाजारात सोन्याचा दर ‘जीएसटी’सह 1 लाख ६३ हजारांपर्यंत खाली आला असून चांदीचा दर 3 लाख तीन हजार रुपयांवर स्थिरावला आहे. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ११ हजारांची, तर चांदीच्या दरात जवळपास ५० हजारांची घसरण झाली आहे.

(विना जीएसटी) आजचे दर काय आहेत?

* **२४ जानेवारी** – सोने: ₹१,४४,९०० | चांदी: ₹३,४०,०००

* **२६ जानेवारी** – सोने: ₹१,६०,००० | चांदी: ₹३,५०,०००

* **२७ जानेवारी** – सोने: ₹१,५९,३०० | चांदी: ₹३,४५,०००

* **२८ जानेवारी** – सोने: ₹१,६४,००० | चांदी: ₹३,६८,०००

* **२९ जानेवारी** – सोने: ₹१,८०,००० | चांदी: ₹४,००,००८

* **३० जानेवारी** – सोने: ₹१,७०,००० | चांदी: ₹३,५०,०००

* **३१ जानेवारी** – सोने: ₹१,५९,००० | चांदी: ₹३,०३,०००

अचानक वाढलेल्या दरांमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता दरात झालेल्या घसरणीमुळे पुन्हा एकदा बाजारात व्यवहार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maagh Pornima 2026: माघ पौर्णिमेला करा हे 5 उपाय; पैशाची तंगी होईल कमी

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल

Yoga Poses For Neck Pain: महिलांनी नियमित करा हे ५ योगा, मानेचं दुखणं होईल कायमचं कमी

हाडांमधून कट-कट आवाज का येतो? यावर काय उपाय केले पाहिजेत?

Lipstick Application Tips : ओठांवर परफेक्ट लिपस्टिक कशी लावावी? जाणून घ्या पध्दत

SCROLL FOR NEXT