GOLD PRICE DROP DUE TO IRAN US TENSIONS | BULLION MARKET VOLATILITY UPDATE saam tv
बिझनेस

Gold Rate : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 22k 24k 18k चे दर

Weekly Gold Rate Update : इराण आणि अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला आहे. जाणून घ्या ताजे दर आणि बाजाराचा अंदाज.

Alisha Khedekar

  • इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर

  • सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण

  • चांदीच्या दरात किंचित वाढ नोंदवली

  • गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, सोन्याचे दर त्यांच्या उच्चांकापेक्षा खाली आले आहेत.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 24 एप्रिल रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,51,479 रुपयांवर होता, जो गेल्या शुक्रवारी घसरून 1,50,263 रुपयांवर आला. म्हणजेच आठवडाभरात प्रति 10 ग्रॅम 1,216 रुपयांची घसरण नोंदवली गेली.

चांदीच्या दरात वाढ

ही घट केवळ फ्युचर्स मार्केटपुरती मर्यादित नसून देशांतर्गत बाजारातही स्पष्टपणे जाणवत आहे. चांदीच्या दरात मात्र किंचित वाढ दिसून आली आहे. 24 एप्रिल रोजी चांदीचा दर 2,50,058 रुपये प्रति किलो होता, जो वाढून 2,51,000 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच प्रति किलो 941 रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच, बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीचे दर अजूनही अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले तणाव, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे कल कमी केला आहे. परिणामी सोन्याच्या मागणीत घट झाली असून त्याचे दर घसरले आहेत. दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या चर्चेची प्रक्रिया सुरू असून युद्धसंधी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात तणाव कमी झाला असला तरी होर्मुज खाडी परिसरातील परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT