Gold Rate 14 May 2024  Saam TV
बिझनेस

Gold Rate 14 May 2024 : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा घसरले; वाचा तुमच्या शहरातील प्रति तोळ्याचा भाव

Gold Silver Rate Falls: मंगळवारी २२ कॅरेट सोन्याची किंमत १० रुपयांनी कमी झाली आहे. ६७,२९० प्रति तोळा आजचा भाव आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ७३,३७० रुपये प्रति तोळा आहे.

Ruchika Jadhav

काल सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा सोनाराच्या दुकानात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याच्या दरामध्ये आज किरकोळ घसरण झाली आहे. मंगळवारी सोन्याची चकाकी १० रुपये प्रति तोळ्याने उतरल्याचे समजले आहे.

सध्या मे महिना सुरू आहे. त्यात सोमवारी अवकाळी पावसाने मुंबईत हजेरी लावली. आता मे महिना म्हणजे लग्नसराईचा महिना. या महिन्यात पाऊस पडला तरी अनेकांची हळदी आणि लग्नाची लगबगही थांबलेली नाही. त्यासह नागरिक आपल्या वधू आणि वरासाठी दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत. आता आज तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर जाणून घेऊ आजचा सोन्यासह चांदीचा भाव.

२२ ते १८ कॅरेटपर्यंत सोने-चांदीच्या किंमती

मंगळवारी २२ कॅरेट सोन्याची किंमत १० रुपयांनी कमी झाली आहे. ६७,२९० प्रति तोळा आजचा भाव आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ७३,३७० रुपये प्रति तोळा आहे. यासह १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५,०५० रुपये प्रति तोळा आहे.

मुंबई-पुण्यातील सोन्याच्या किंमती

मुंबईत आज २२ कॅरेट ६७,१४० रुपये, २४ कॅरेट ७३,२४० रुपये, १८ कॅरेट ५४,९३० रुपये प्रति तोळा आहे.

पुण्यातही सोन्याचे दर घसरले आहेत. पुण्यात २२ कॅरेट ६७,१४० रुपये, २४ कॅरेट ७३,२४० रुपये, १८ कॅरेट ५४,९३० रुपये प्रति तोळा आहे.

चांदीचे दर

आज १०० ग्राम चांदीच्या किंमती प्रति किलो १०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे आजची किंमत ८६,४०० प्रति किलो आहे. मुंबईत चांदी ८६,४०० आणि चेन्नईत ८९,०००, नवी दिल्लीत ८६,४०० , पुण्यातही ८६,४०० रुपये प्रति तोळा चांदी विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: खेडमध्ये शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Nagar Panchayat Elections: भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याआधीच गुलाल कसा उधळतो?

Jeera Rice Recipe: इंद्रायनी तांदळाचा जिरा राईस कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT