Gold Silver Rate Today (29 July 2024) Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate Today (29 July 2024) : सत्तरी पार गेलेलं सोनं आलं ६० हजारांच्या घरात; वाचा आजचा भाव कितीने घसरला

Gold Silver Rate Fall : सोन्याचे दर ६० हजारांच्या घरात पोहचले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगलीच घसरण झालेली दिसत आहे.

Ruchika Jadhav

सोने-चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोने-चांदीच्या किंमतीमध्ये जोरदार घसरण झाली आहे. सोन्याचा भाव गेल्या महिन्यात अगदी ७० हजार रुपये तोळ्यावर पोहचला होता. हाच भाव आता कमी झाला असून सोन्याचे दर ६० हजारांच्या घरात पोहचले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगलीच घसरण झालेली दिसत आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ६,३३,९०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव आज ६३,३९० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ५०,७१२ रुपये आहे. १ ग्राम सोन्याची किंमत ६,३३९ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेटमध्ये सुद्धा १०० ग्राम मागे १०० रुपयांची घसरण झालीये. १० ग्राम एक तोळा सोन्याचा भाव आज ५१,८६० रुपये आहे. ८ ग्राम ४१,४४८ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत ५,१८६ रुपये इतकी किंमत आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव आज १०० रुपयांनी कमी झाला आहे. १०० ग्राम सोन्याचा आजचा भाव ६,९१,४०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव आज ६९,१४० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ५५,३१२ रुपये आहे. १ ग्राम सोन्याची किंमत ६,९१४ रुपये आहे.

विविध शहरांतील आजचा भाव

मुंबईतील १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३२४ रुपये

२४ कॅरेट - ६,८९९ रुपये

पु्ण्यात १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३२४ रुपये

२४ कॅरेट - ६,८९९ रुपये

नवी दिल्लीमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३३९ रुपये

२४ कॅरेट - ६,९१४ रुपये

जयपूरमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३३९ रुपये

२४ कॅरेट - ६,९१४ रुपये

अहमदाबादमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,३२९ रुपये

२४ कॅरेट - ६,९०४ रुपये

चांदीचा भाव काय?

चांदीच्या किंमतीतही सातत्याने घसरण सुरू आहे. आज एक किलो चांदी १०० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे आजचा भाव ८४,४०० रुपये आहे. चांदीचा भाव भारतात सर्व शहरांसाठी सारखाच असतो. त्यामुळे सर्व शहरांमधील चांदीचा भाव आज ८४,४०० रुपये इतकाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT