Gold Silver Rate (5th February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (5th February 2024): आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, चांदीची चकाकी उतरली; मुंबई-पुण्यातील आजचा दर किती?

Today's (5th February 2024) Gold Silver Rate In Maharashtra: . सराफ बाजार उघडताच सोन्याचा भाव १६० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी प्रतिकिलो ३०० रुपयांनी कमी झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (5th February 2024):

लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होईल. अशातच सोने स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारीच्या महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात पतझड पाहायला मिळाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर कमी जास्त झालेले पाहायला मिळाले. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या (Gold)-चांदीचे दर घसरले आहेत. सराफ बाजार उघडताच सोन्याचा भाव १६० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी प्रतिकिलो ३०० रुपयांनी कमी झाली आहे.

शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. परंतु, आज पुन्हा सोन्याचा भाव गडगडला आहे. अंतिरम अर्थसंकल्पाचा परिणाम सराफ बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेलेही पाहायला मिळाले. जाणून घेऊया महाराष्ट्राह मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार १५० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,३७० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार १६० रुपयांनी घसरण झाली आहे.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,२०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या दरात १ किलोनुसार ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,२२० रुपये

  • पुणे - ६३,२२० रुपये

  • नागपूर - ६३,२२० रुपये

  • नाशिक - ६३,२५० रुपये

  • ठाणे - ६३,२२० रुपये

  • अमरावती - ६३,२२० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT