Gold Silver Price (27 July 2024) Saam tv
बिझनेस

Gold Silver Price (27 July 2024) : आठवडाभरात सोने 5, तर चांदीत ११ हजार रुपयांची घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold Silver Rate : सोने-चांदीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भाव कोसळले असून आज शनिवारपर्यंत संपूर्ण आठवडाभरात सोने 5, तर चांदीत ११ हजार रुपयांनी खाली घसरली आहे.

Ruchika Jadhav

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीच्या दरांबाबत मोठी घोषणा करण्यात आली होती. यामध्ये सर्व महागड्या धातुंवरील सीमा शुल्क कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ही घोषणा होताच सोने-चांदीचा भाव गडगडला. दुसर्‍या दिवसापासून लगेचच सोने-चांदीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भाव कोसळले असून आज शनिवारपर्यंत संपूर्ण आठवडाभरात सोने 5, तर चांदीत ११ हजार रुपयांनी खाली घसरली आहे.

गुडरिटर्नस या साईटवर आलेल्या माहितीनुसार, आज देखील सोने-चांदीचा भाव कोसळला आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत? प्रति तोळा सोन्याचा भाव काय आहे? याची माहिती जाणून घेऊ.

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी खाली घसरला आहे. त्यामुळे आज १०० ग्राम सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६,३१,४०० रुपये मोजावे लागतील. तर १० ग्राम सोन्याचा भाव ६३,१४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५०,५१२ रुपये आहे आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,३१४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा कमी झाला आहे. यामध्ये १०० ग्राम सोन्याची किंमती ६,८८,७०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६८,८७० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव ५५,०९६ रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ६,८८७ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

आज १८ कॅरेटचा भाव ५,१६,६०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव आज ५१,६६० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४१,३२८ रुपये आहे आणि १ ग्राम सोन्याचा भाव ५,१६६ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्राम सोन्याच्या किंमती

मुंबईमध्ये २२ कॅरेट ६,२९९ रुपये आणि २४ कॅरेट ६,८७२ रुपये.

पुण्यामध्ये २२ कॅरेट ६,२९९ रुपये आणि २४ कॅरेट ६,८७२ रुपये.

कोलकत्ता २२ कॅरेट ६,२९९ रुपये आणि २४ कॅरेट ६,८७२ रुपये.

मेरठमध्ये २२ कॅरेट ६,३१४ रुपये आणि २४ कॅरेट ६,८८७ रुपये.

लुधियाना २२ कॅरेट ६,३१४ रुपये आणि २४ कॅरेट ६,८८७ रुपये.

लखनऊमध्ये २२ कॅरेट ६,३१४ रुपये आणि २४ कॅरेट ६,८८७ रुपये.

चांदीचा आजचा भाव

प्रति किलो चांदीचा भाव सुद्धा १०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज चांदी ८४,४०० रुपये प्रति किलो आहे. संपूर्ण देशातील विविध शहरांमध्ये देखील चांदीचा भाव हाच असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT