Gold rate  Saam tv
बिझनेस

अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

gold rate today : अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीही चकाकली आहे. सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होतेय

चांदीचा भाव आठवड्याभरात ३२००० रुपयांनी वाढला

तर सोन्याचा भाव मागील ४ दिवसांत ५७०० रुपयांनी वाढला

सोने-चांदीच्या किमती वर्षाच्या अखेरीस नवनवीन विक्रम रचत आहे. सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. मागील आठवड्याभरात चांदीच्या किंमतीत १७००० रुपयांनी महागली आहे. तर मागील आठवड्यातील ४ दिवसांत १ किलो चांदीचा भाव ३२००० रुपयांनी वाढला आहे. तर आठवड्याभरात सोन्याचा भाव ५७०० रुपयांनी वाढला आहे.

चांदीत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल होत आहेत. भविष्यातही चांदीच्या दरात वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. २०२५ वर्ष संपण्यासाठी अवघे ३ दिवस राहिले आहेत. वर्ष अखेरीसही चांदीची मागणी वाढत असल्याने दरातही वाढ होत आहे.

MCX Silver Price नुसार, 19 डिसेंबर रोजी चांदीचा भाव २,०८,४३८ वर पोहोचला होता. तर मागील शुक्रवारी ४ दिवसानंतर चांदीचा भाव २,४०,९३५ रुपयांवर पोहोचला होता. एकंदरित एक किलो चांदीचा भाव ३२,४९६ रुपयांनी वाढला आहे.

चांदीसोबत सोन्याचे दर देखील वाढत आहे. एमसीएक्स गोल्ड रेटनुसार, आठवड्याभरात १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ५७४४ रुपयांनी वाढला. तर १९ डिसेंबर रोजी सोन्याचा भाव १,३४, १९६ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर शुक्रवारी सोन्याचा दर १,३९,९४० रुपयांपर्यंत पोहोचला.

इंडियन बुलियन ज्वेलर्सच्या वेबसाइटनुसार, १९ डिसेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३१,७७९ रुपये प्रति ग्राम इतका होता. त्यानंतर शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर सोन्याचा भाव १,३७,९५६ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला. आठवड्याभरात देशाअंतर्गत बाजारात सोन्याचा भाव ६,१७७ रुपयांनी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT