Gold and silver prices  Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज वाढ झाली की घसरण? खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

Gold And Silver Prices Today: सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे. आठवडाभरामध्ये सोनं-चांदीच्या दरात किती घसरण झाली आणि आजचे तुमच्या शहरातील दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • भारतात सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच

  • आठवडाभरात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

  • मुंबई दिल्ली चेन्नईतील सोन्याचे ताजे दर

  • सोनं खरेदी करण्यापूर्वी आजचे गोल्ड रेट तपासा

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सध्या संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅस, तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आठवडाभराची तुलना केली तर सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावे लागतील हे आपण जाणून घेणार आहोत...

मागच्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी ६ मार्च रोजी १ तोळा सोन्याचे दर १,६१,६७५ रुपये इतके होते. तर त्याच दिवशी १ किलो चांदीचे दर २,६८,५७९ रुपये होते. आता पूर्ण आठवडा सोनं-चांदीचे दर पाहिले तर १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,२७५ रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ९,३३० रुपयांनी घसरण झाली.

दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये १० ग्रॅम चांदी आज २,७५० रुपयांना विकली जात आहे. तर १०० ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २७,५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. चेन्नईमध्ये १० ग्रॅम चांदी २,८०० रुपयांना विकली जात आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तुमच्या शहरातील १ तोळा सोन्याचे दर किती?

दिल्ली -

२४ कॅरेट - १,५९,८१० रुपये

२२ कॅरेट - १,४६,५०० रुपये

१८ कॅरेट - १,१९,८९० रुपये

मुंबई -

२४ कॅरेट - १,५९,६६० रुपये

२२ कॅरेट - १,४६,३५० रुपये

१८ कॅरेट - १,१९,७४० रुपये

चेन्नई -

२४ कॅरेट - १,६१,०२० रुपये

२२ कॅरेट - १,४७,६०० रुपये

१८ कॅरेट - १,२४,००० रुपये

कोलकाता-

२४ कॅरेट - १,५९,६६० रुपये

२२ कॅरेट - १,४६,३५० रुपये

१८ कॅरेट - १,१९,७४० रुपये

अहमदाबाद -

२४ कॅरेट - १,५९,७१० रुपये

२२ कॅरेट - १,४६,४०० रुपये

१८ कॅरेट - १,१९,७९० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT