Gold Silver Prices Fall Saam TV
बिझनेस

Gold Silver Prices Fall : ग्राहकांना मोठा दिलासा! महागड्या सोन्याचा भाव उतरला; चांदीही झाली स्वस्त

Gold Silver Prices (24 May 2024) : आज देखील पुण्यात सोन्याचे दर १८ कॅरेटसाठी ५,५०६ , २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,७२९ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे दर ७,३४१ रुपये प्रति ग्राम आहेत.

Ruchika Jadhav

राज्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असते. अशात दागिने खरेदी करण्याचा प्लान आहे आणि सोनं महागलं म्हणून थांबले असाल तर आजचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. कारण आज सोन्यासह चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासह राज्यात आज काय दर आहेत याची महिती जाणून घेऊ.

आज १०० ग्राम सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी घसरल्या आहेत. १८, २२ आणि २४ कॅरेट सोनं कालच्या दरांपेक्षा आज स्वस्त झालं आहे. काल १०० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६,७४,५०० रुपये होती तर आज ६,७४,४०० रुपये १०० ग्राम सोन्याची किंमत आहे. २४ कॅरेटचा कालचा दर ७,३५,७०० रुपये होता तर आज ७,३५,६०० रुपये प्रति १०० ग्रामने सोनं विकलं जात आहे.

मुंबई आणि पुण्यातील दर

मुंबईत सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. आज २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,७२९ रुपये, १८ कॅरेट सोनं ५,५०६ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर ७,३४१ रुपये प्रति ग्राम आहे. पुण्यातही सोन्याच्या दरात बदल झाला आहे. मात्र मुंबई आणि पुण्यातील दर नेहमी सारखेच असतात. आज देखील पुण्यात १८ कॅरेट सोनं ५,५०६ , २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,७२९ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे दर ७,३४१ रुपये प्रति ग्राम आहेत.

मुंबई-पुण्यातील चांदीच्या किंमती

मुंबई आणि पुण्यातील सोन्याच्या दरांप्रमाणे चांदीच्या किंमती देखील सारख्याच असतात. आज चांदी प्रति किलो १०० रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे ९२,४०० प्रति किलो दराने आज चांदी विकली जात आहे.

अन्य शहरांमधील सोनेच अन् चांदीच्या किंमती

लखनऊ

सोनं- ६,७४४ प्रति ग्राम

चांदी - ९२,४००

जयपूर

सोनं- ६,७४४ प्रति ग्राम

चांदी - ९२,४००

नवी दिल्ली

सोनं- ६,७४४ प्रति ग्राम

चांदी - ९२,४००

पटना

सोनं- ६,७३४ प्रति ग्राम

चांदी - ९२,४००

अहमदाबाद

सोनं- ६,७३४ प्रति ग्राम

चांदी - ९२,४००

कोलकत्ता

सोनं- ६,७२९ प्रति ग्राम

चांदी - ९२,४००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT