Today's Gold Silver Rate, (5th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्या-चांदीच्या दरात हजार रुपयांनी वाढ, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

(5th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: लग्नसराईचा काळ असून ग्राहकांचा अधिक कल हा धातुंच्या किमतीवर अधिक असतो. त्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. आज सोन्याने पुन्हा एकदा उच्चाकांची पातळी ओलांडली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (5th March 2024):

लग्नसराईचा काळ असून ग्राहकांचा अधिक कल हा धातुंच्या किमतीवर अधिक असतो. त्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. आज सोन्याने पुन्हा एकदा उच्चाकांची पातळी ओलांडली आहे.

मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात १००० रुपयांनी तर चांदीच्या दरात ११०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

यापूर्वी सोन्याच्या दराने डिसेंबर २०२३ मध्ये उच्चाकांची पातळी गाठली होती. आज सोन्याचा भाव ६५ हजारांवर पोहोचला आहे. मिळालेल्या महितीनुसार काही महिन्यांपूर्वी सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली. यामुळे देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून आली. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९६० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६५,००० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ७६० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,७०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ११०० रुपयांनी वाढ झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६४,८५० रुपये

  • पुणे - ६४,८५० रुपये

  • नागपूर - ६४,८५० रुपये

  • नाशिक - ६४,८८० रुपये

  • ठाणे - ६४,८५० रुपये

  • अमरावती - ६४,८५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT