तुम्ही देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ३१ मार्च पर्यंत खरेदी करु शकता. स्वस्त दरात तुम्ही ईव्ही खरेदी करु शकता. यानंतर ईव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच इलेक्ट्रिक वाहनांवर FAME- II योजनेंतर्गत दिलेली सबसिडी ३१ मार्चपर्यंतच देणार आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत ज्या वाहनांची नोंदणी होईल अशाच कंपन्यांना सरकार सबसिडी देणार आहे. यानंतर ग्राहकांना कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) किमती (Price) वाढवतील.
२० फेब्रुवारीला झालेल्या उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत Hero MotoCorp, Ather Energy, Bajaj Auto, TVS Motor Company, Ola Electric आणि Mahindra & Mahindra या कंपन्यांनी आपले मत मांडले. तसेच सरकारडून FAME- II च्या योजनेचा विस्तार करण्याचे सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपन्यांकडे इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक साठा आहे. हा साठा संपवण्यासाठी कंपन्यांवर भरघोस सूट देत आहे. तसेच टॉर्क मोटर्स त्यांच्या इलेक्ट्रीक बाइक Kratos R वर ३७, ५०० रुपयांपर्यंतची ऑफर (Offer) करत आहे.
1. ईव्ही बॅटरी
ईव्ही एनर्जीचे सीईओ संयोग तिवारी म्हणतात, भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लिथियमचे साठे अधिक प्रमाणात सापडले आहे. त्यामुळे ईव्ही बॅटरीच्या क्षेत्रात अधिक वर्चस्व असणाऱ्या चीनी उत्पदकांचा बाजारातील हिस्सा कमी होताना दिसून आला आहे. तसेच लिथियम आयन बॅटरीला पर्याय म्हणून ठेवल्याने इतर बॅटरी वेगाने तयार होतात. त्यामुळे लिथियम आयन बॅटरीच्या किमती घसरत आहेत.
2. सरकारने FAME योजना कधी आणली?
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने २०१९ मध्ये FAME योजना सुरु केली होती. या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सबसिडी देखील दिली जाते.
3. २-३ वर्षात पेट्रोल आणि ईव्हीच्या किमती समान
अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले की, पेट्रोल दुचाकी उत्पादक कंपन्या ईव्हीचे मॉडेल वाढवण्यावर अधिक भर देत आहे. सध्या त्यांचा वाटा हा ५ टक्के च्या जवळपास आहे. येत्या २ ते ३ वर्षात यात अनेक पटीने वाढ होईल. पेट्रोल टू-व्हीलरच्या जवळपास या किंमती कमी होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.