Gold Silver Price Today (7th November) Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Today (7th November): दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात घसरण, तुमच्या शहरातील आजचा दर किती? जाणून घ्या

Today's (7th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : काल सायंकाळच्या भावात सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (7th November 2023):

अवघ्या काही दिवासात दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल. त्यामुळे ग्राहकांचा अधिक कल हा सोनं-चांदी खरेदी करण्यावर असतो. या काळात अधिक प्रमाणात सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक केली जाते.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली. दसऱ्यात सोन्याने ६२ हजारांचा टप्पा ओलांडला होता. परंतु, अशातच काल सायंकाळच्या भावात सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, काल सायंकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६४० रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,५१० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात ११० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) किमतीतही घट झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७४,५०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

मुंबई (Mumbai) -पुण्यात गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २४ कॅरेटनुसार ६१,३६० रुपये मोजावे लागणार आहे तर नागपूर-ठाण्यातही भाव सारखाच आहे. आज नाशकात २४ कॅरेटसाठी ६१,३९० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Tips: संपूर्ण दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती

Shocking : गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, खोलीत बॉयफ्रेंडसोबत होते ४ मित्र; मुलीसोबत केलं भयंकर कृत्य, मधेपुरा हादरलं

Viral Video: ट्रेनमधील पँट्रीवाल्यांची गुंडगिरी! प्रवाशाला मार-मारलं; भांडण सोडवण्याऐवजी लोकांनी व्हिडिओ बनवला

Crime News: ६ वर्षांच्या मुलीवर गँगरेप, रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली अन्...; १० ते १४ वयोगटातील ३ मुलाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT