Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, १० तोळे सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २४ -२२ कॅरेटचे आजचे भाव किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. १० तोळे सोनं ४,३०० रुपयांनी महागले. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात देखील १ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाली

  • आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याच्या दरात ४३० रुपयांची वाढ झाली

  • १० तोळा सोनं ४३०० रुपयांनी महागलं

  • चांदीचा दर प्रति ग्रॅम १५१.५० इतका झाला

सोनं-चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर कधी कमी तर कधी वाढत आहेत. बुधवारी सोन्याच्या दरात घट झाली होती तर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४३०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीमध्ये १ रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही आज त्यांचे नेमके दर किती आहेत ते घ्या जाणून...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ४३० रुपयांनी वाढले आहेत. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२१,९१० रुपये खर्च करावे लागणार आहे. हे सोनं बुधवारी १,२१,४८० रुपयांना विकले गेले होते. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,३०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,१९,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं बुधवारी १२,१४,८०० रुपयांना विकले गेले होते. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,११,७५० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं बुधवार १,११,३५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ४,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,१७,५०० रुपये खर्च करावे लागतील. हेच सोनं बुधवारी ११,१३,५०० रुपयांना विकले गेले होते.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३२० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९१,४३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे सोनं बुधवारी ९१,११० रुपये खर्च करावे लागले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,१४,३०० रुपये मोजावे लागणार आहेत. बुधवारी हेच सोनं खरेदीसाठी ९,११,१०० रुपयांना विकले गेले होते.

सोन्यासोबतच चांदीचे दरात देखील वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये १ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १५१.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांनी वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५१,५०० रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे सोन्यासोबत चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत 15 पदाधिकाऱ्यांचं निलंबन; अमरावतीमधील राजकारणात मोठी खळबळ

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

SCROLL FOR NEXT