Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला! १० तोळा १३,७०० रुपयांनी महागलं; २२ - २४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोनं आणि चांदीचे दर किती हे घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • सोन-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे.

  • २४ कॅरेट सोनं १,३७० रुपयंनी महागले आहे.

  • २२ कॅरेट सोनं १,२५० रुपयांनी वाढले आहे.

  • १० तोळा सोनं खरेदीसाठी तब्बल १३,७०० रुपये जास्त मोजावे लागणार आहे.

नवरात्रीमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. दसऱ्यानंतर सोन्याचे दर कमी होतील अशी आशा ग्राहकांना होती. पण सोन्याचे दर वाढतच चालले आहे. आज सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं १,३७० रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी सोनं आणि चांदीचे दर किती आहेत हे जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,३७० रुपयांनी वाढले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,२०,७७० रुपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १३,७०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,०७,७०० रुपये खर्च लागणार आहेत.

२२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१०,७०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दरामध्ये तब्बल १२,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,०७,००० रुपये मोजावे लागणार आहेत. कालपर्यंत हेच सोनं १०,९४,५०० रुपयांना मिळत होते.

२४, २२ कॅरेट सोन्याच्या पाठोपाठ १८ कॅरेट सोन्याचे दर देखील वाढले आहेत. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,०३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९०,५८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. काल या सोन्याचे दर ८९,५५० रुपये इतके होते. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०,३०० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,०५,८०० रुपये मोजावे लागतील. तर काल हेच सोनं ८,९५,५०० रुपयांना खरेदी करता येत होते.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीला देखील चकाकी आली आहे. चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी १ रुपयांनी महागली असून ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला १५६ रुपये खर्च करावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांनी वाढ झाली असून ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,५६,००० रुपये मोजावे लागणार आहेत. आज सोनं आणि चांदी दोन्ही खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत महापौर कुणाचा? मनसे की ठाकरे? बड्या खासदाराने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : गौतमी पाटीलला क्लिनचीट, अपघातावेळी वाहनात नव्हती

Crime: शौचासाठी घराबाहेर पडली, परत आलीच नाही; बलात्कार करून चिमुकलीची हत्या, शेजारच्या घरातच...

मोठी बातमी! नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; कोणती जागा कुणासाठी? VIDEO

DA Hike: खुशखबर! आठव्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; या महिन्यापासून येणार

SCROLL FOR NEXT