Today's Gold Silver Rate, (19th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही वधारली; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (19th March 2024):

लग्नसराईच्या काळात दागिने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. मागच्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता. अशातच काल आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दराने ब्रेक लावलेला पाहायला मिळाला.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसांत दोन्ही धातूंनी मोठी वाढ केली होती. १ ते १० मार्च दरम्याने सोने आणि चांदीमध्ये भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदीचा जोरदार सपाटा लावला आहे.

आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सनुसार जगभरातील सोन्याचे एकूण मूल्य मार्च २०१० मध्ये सहा ट्रिलियन डॉलर इतके होते. मार्च २०२४ मध्ये अडीच पटीने वाढून १५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०९५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,४८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ४६० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,३०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६६,३०० रुपये

  • पुणे - ६६,३०० रुपये

  • नागपूर - ६६,३०० रुपये

  • नाशिक - ६६,३६० रुपये

  • ठाणे - ६६,३०० रुपये

  • अमरावती - ६६,३०० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT