Gold Silver Rate (16th February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (16th February 2024): सोन्याच्या भावात वाढ, चांदीही चकाकली, जाणून घ्या आजचा भाव

Today's (16th February 2024) Gold Silver Rate In Maharashtra: लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (16th February 2024):

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. परंतु, लग्नसराईमुळे खरेदीदारांचा अधिक कल धातूंच्या किंमतीवर अधिक असतो. यापूर्वी मकर संक्रांतीच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार या वर्षात सोन्या-चांदीचे दर नवीन रेक्रॉड ब्रेक करु शकतात. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी सोन्याच्या (Gold) किमती वाढल्या होत्या. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसून आली. अशातच आज भाव पुन्हा वाढलेला पाहायला मिळत आहे.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७२५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,४४० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price) वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,६०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत ११० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,२९० रुपये

  • पुणे - ६२,२९० रुपये

  • नागपूर - ६२,२९० रुपये

  • नाशिक - ६२,३२० रुपये

  • ठाणे - ६२,२९० रुपये

  • अमरावती - ६२,२९० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharadi devi jatra: जत्रेक येऊकच व्हया! कधी आहे यंदाच्या वर्षी आंगणेवाडीची जत्रा?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

IND vs Pak : ठरलं! गरीब पाकिस्तानानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, भारताविरुद्ध T20 वर्ल्डकप सामना खेळणार नाही

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT