Today's Gold Silver Rate, (13th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली; वाचा आजचे नवे दर

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

सोन्या-चांदीच्या दरात काल उसळी पाहायला मिळाली होती. काल सोन्याच्या दराने ७३ हजारांचा आकडा पार केला होता. अशातच आज सकाळच्या सत्रात भाव किंचित नरमले आहे.

ऐन लग्नसराईच्या काळात भावात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. त्यानंतर दरवाढीचे सत्र सुरुच होते.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दराचा वाढता आलेख पाहायला मिळाला. आज तब्बल १३ दिवसांनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२, २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. तर काल सोन्याच्या भाव ७३,४६० रुपये इतका होता. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६६५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,७०० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ७६० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८५,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,५५० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,५५० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,५५० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,५८० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,५५० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,५५० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT