गेल्या दोन दिवसांपासून सोनं- चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत होती. त्यामुळे सोनं खरेदी करावी की आणखी काही दिवस दर कमी होण्याची वाट पाहावी, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. पण आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी जळगाव सराफा बाजार सुरू होताच सोनं-चांदीच्या किंमतींनी पुन्हा उसळी घेतली. जळगावच्या सराफा बाजारात सोनं १ हजार रुपयांनी, तर चांदीत ४ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
जळगावमध्ये आज सोन्याचा भाव १ लाख २५ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर १ लाख ५६ हजार रुपये नोंदवण्यात आला. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला.
गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठे चढ-उतार सुरू आहेत. दोन दिवसांआधी किंमतीत घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आज बाजार उघडताच सोन्याने १ हजार रुपयांची, तर चांदीने ४ हजार रुपयांची वाढ नोंदवली. त्यामुळे लग्नसराईच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं लक्ष पुन्हा किंमतींकडे लागलं आहे.
सोनं - १,२४,५०० रुपये १ तोळा
चांदी - १,५६,००० रुपये
सोनं-चांदीच्या किंमतीत गेले काही दिवस चढ उतार सुरू असल्यामुळे ग्राहकांना खरेदीचा निर्णय घेणं कठीण झालंय. ज्यांना लग्नासाठी दागिने खरेदी करायची आहे, असे ग्राहक याच्या किंमती कमी होण्याची वाट पाहतायेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी आणि रुपयातले चढ-उतार यांचा परिणाम स्थानिक बाजारावरही होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.