Today's Gold Silver Rate  Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याला उतरती कळा, चांदीही दणकून आपटली; वाचा आजचे दर

(23rd April 2024) Gold Silver Price In Maharashtra: आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्याने खरेदीदारांना टेन्शन आले होते. अशातच आज सलग तीन आठवड्यानंतर धातुंच्या किंमती नरमल्या आहेत.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra :

आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्याने खरेदीदारांना टेन्शन आले होते. अशातच आज सलग तीन आठवड्यानंतर धातुंच्या किंमती नरमल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीनी विक्रमी उच्चांक गाठला होता. मागच्या काही दिवसात सोन्याचा भाव हा २४०० डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळला होता. यामुळे भारतीय बाजारपेठेत सुद्धा सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या भावाने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. भू-राजकीय परिस्थिती, मध्यवर्ती बँकांचे कर्ज यामुळे किंमती वाढच होत्या. अशातच ग्राहकांना आज काही प्रमाणात खरेदीसाठी दिलासा मिळू शकतो. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६३० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,३१० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold)भावात १,५३० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८३,००० रुपये मोजावे लागतील. तर आज चांदीच्या भावात २,५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,१६० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,१६० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,१६० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,१९० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,१६० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,१६० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT