Gold Silver Price Today (2nd October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (2nd October): आनंदाची बातमी! सोन्या- चांदीच्या भावात घसरण कायम; जाणून घ्या नवे दर

Today's 2nd October Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या आठवड्यात २२ कॅरेटसाठी ३३० रुपयांनी घसरण झाली होती. आज किती पैसे मोजावे लागणार जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (2nd October):

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्या-चांदीचे भाव कोसळले आहेत. पितृपक्षाचा काळ सुरु झाला असून या काळात दर घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात पडझड पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याचे भाव घसरले आहे. शनिवारी (30 सप्टेंबर) ला मुंबईत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात २२ कॅरेटसाठी ३३० रुपयांनी घसरण झाली होती. आज किती पैसे मोजावे लागणार जाणून घेऊया

1. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,३५० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,१९० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात २४ कॅरेटनुसार १६० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव किती?

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७३५ रुपयांनी होता तर आज १० ग्रॅमसाठी ७३० रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्या भावात प्रति किलोने ५०० रुपयांनी घट झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 58,040 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 58,040 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 58,070 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT