दिवाळीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करण्याचा ग्राहकांचा अधिक कल असतो. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं खरेदीला विशेष मान आहे. या काळात अधिक प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
दसऱ्यापूर्वी सोन्याच्या भावात अधिक प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. यावेळी सोन्याने ६२ हजारांचा आकडा पार केला होता. परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्यात १२०० रुपयांनी घट झाली होती. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये पतझड झालेली पाहायला मिळाली. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होणार असे सराफ बाजारातील व्यापारी वर्गाने सांगितले होते. परंतु, या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली.
उद्यापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल. या काळात सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी मंदियाळी पाहायला मिळेल. सोन्याचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६२५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,३५० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात १६० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) किमतीतही घट झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७३,५०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार मुंबई-पुणे-ठाणे आणि नागपूरमध्ये सोन्याचे भाव हे काही प्रमाणात सारखेच असतात. आज सोन्याच्या भावात १६० रुपयांनी घट झाली आहे. अशातच २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,२०० रुपये मोजावे लागणार आहे तर नाशिकमध्ये २४ कॅरेटसाठी ६१,२३० रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.