Today's Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Today's Gold Silver Rate : चांदीच्या दरात प्रति किलो ०६ हजारांची घट, सोनंही स्वस्त झालं; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी

(3rd May 2024) Gold Silver Price In Maharashtra: बाजारपेठेत चांदीच्या मागणीला असलेली मंदी या कारणांमुळे गेल्या महिन्यात ८६००० रुपये प्रति किलो असलेली चांदी आता मात्र ८० हजार ते ८०, ५०० रू.प्रति किलोपर्यंत घसरली आहे.

Ruchika Jadhav

गेल्या महिन्यात सोन्यासह चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. एप्रिलच्या शेवटच्या २ दिवसांत हे दर चांगलेच कोसळेत. आखाती देशातील युद्धाचे ढग व जागतिक बाजारपेठेत चांदीच्या मागणीला असलेली मंदी या कारणांमुळे गेल्या महिन्यात ८६००० रुपये प्रति किलो असलेली चांदी आता मात्र ८० हजार ते ८०, ५०० रू.प्रति किलोपर्यंत घसरली आहे.

गेल्या बारा दिवसात चांदीच्या दरात ६००० रुपये प्रति किलो इतकी घसरण झाली आहे. ऐन लग्न सराईच्या दिवसात चांदी मोठ्याप्रमाणावर घसरल्याने नागरिकांनी खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केलीये.

गेल्या आठवड्याभरापासून सोन्याच्या भावात देखील मोठी घट झाली आहे. गेल्या महिन्यात ७२ हजार रुपये प्रति तोळा गेलेलं सोन आता ६८ हजार रुपये प्रति तोळ्यावर येऊन पोहचलं आहे.

चार प्रमुख शहरांतील सोनाच्या किंमती

मुंबई : सोनं- ६६,२६० प्रति तोळा

चेन्नई : सोनं- ६७,१६० प्रति तोळा

नवी दिल्ली :सोनं- ६६,४१० प्रति तोळा

कोलकत्ता: सोनं- ६६,२६० प्रति तोळा

चार प्रमुख शहरांतील चांदिच्या किंमती

मुंबई : चांदी- ८३,६०० किलो

चेन्नई : चांदी-८७,१०० किलो

नवी दिल्ली : चांदी- ८३,६०० किलो

कोलकत्ता: चांदी- ८३,६०० किलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT