Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! १० तोळा सोनं १३,६०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. १० तोळा सोनं १३,६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • २४ कॅरेट १० तोळा सोनं ₹१३,६०० स्वस्त

  • २२ कॅरेट १ तोळा सोनं ₹९२,५५० ला उपलब्ध

  • चांदी ₹१,००० स्वस्त; १ किलो दर ₹१,१८,०००

  • ग्राहकांसाठी सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होती होती त्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती. पण आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १३६० रुपयांनी घट झाली आहे. तर १ किलो चांदीचे दर १००० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते एकदा जाणून घ्या...

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १,३६० रुपयांनी घट झाली आहे. आज हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,००,९७० रुपये खर्च करावे लागणार आहे. काल याच सोन्याच्या दर १,०२,३३० रुपये इतका होता. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर १३,६०० रुपयांनी घसरले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,०९,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,२५० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९२,५५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२,५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,२५,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तर आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १०२० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७५,७३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. १८ कॅरेटचे १० तोळा सोन्याचे दर १०,२०० रुपयांनी घसरले आहेत. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ७,७५,३०० रुपये खर्च करावे लागतील. महत्वाचे म्हणजे, सोन्यापाठोपाठ आता चांदीचे दर देखील घसरले आहेत. १ ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांनी घसरण होत ती ११८ रुपयांवर आली आहे. तेर १ किलो चांदीच्या दरात १००० रुपयांनी घसरण झाली असून आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी १,१८,००० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आज फक्त सोनंच नाही तर चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT