Dhanshri Shintre
शिळ्या तांदळाच्या पाण्याला पेखम, पाणी भात किंवा आंबवलेले तांदूळ असे पारंपरिक नावांनी ओळखले जाते.
सध्या सोशल मीडियावर आंबट तांदळाच्या पाण्याची लोकप्रियता वाढली आहे; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?
आंबवलेल्या तांदळात प्री-बायोटिक गुणधर्म असतात, जे पचन सुधारतात आणि पोटाच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
आंबट तांदळाचे पाणी आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
शिळ्या तांदळाच्या पाण्यात असलेले नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करून थकवा कमी करण्यात मदत करतात.
शिळ्या तांदळाच्या पाण्यातील पोषकतत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
शिळ्या तांदळाच्या पाण्यामुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळते, जे हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
शिजवलेल्या तांदळात तितकेच पाणी घालून ते एका भांड्यात ठेवा आणि झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवा.
तांदळाचे पाणी ५-६ तास ठेवल्यानंतर प्यावे किंवा लिंबू, मीठ घालून भातासोबत सेवन करावे.