Dhanshri Shintre
पकोडे आणि बिस्किटे यामध्ये जास्त प्रमाणात तेल आणि साखर असते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
ब्रेड आणि बिस्किटेमध्ये प्रामुख्याने रिफाइंड फ्लौर वापरला जातो, जो पचन शक्ती करतो व बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढवतो.
बिस्किटे, ब्रेड आणि पकोड्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते, विशेषतः डायबिटीस असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे.
पकोडे तळताना वापरल्या जाणाऱ्या तेलात ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खराब असतात.
सतत चहासोबत गोड बिस्किटे किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
काही बिस्किटे आणि ब्रेडमध्ये कॅमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
ब्रेड आणि बिस्किटे यामध्ये फायबर कमी असल्यामुळे पाचन प्रणाली खराब होऊ शकते व शरीरात टॉक्सिन जमा होऊ शकतात.
पकोडे, बिस्किटे आणि काही ब्रेडमध्ये साखर आणि मीठ जास्त असते, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते.