Gold Price Today  saam tv
बिझनेस

Gold Rate Today: युद्ध थांबताच सोन्यानं उच्चांक गाठला, सोनं ३९,८०० रुपयांनी महागलं; २४ अन् २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सराफा बाजार उघडताच सोनं-चांदी चांदीच्या दरात आज वाढ झाली. अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामच्या घोषणेनंतर सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

Priya More

Summary -

  • इराण- अमेरिका युद्धविरामानंतर सोन्याने उच्चांक गाठला

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ३९,८०० रुपयांनी महागलं

  • २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्यातही मोठी वाढ

  • १ किलो चांदीच्या दरात १०,००० रुपयांची वाढ झाली

इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३९,८०० रुपयांची वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. आज सोनं- चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याचे आणि चांदीचे दर किती ते जाणून घ्या....

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,९८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५३,८२० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३९,८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १५,३८,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटका बसला.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ३,६५० रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,४१,००० रुपये मोजावे लागणार आहे. मंगळवारी हे सोनं १,३७,३५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ३६,५०० रुपयांनी महाग झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,१०,००० रुपये खर्च करावे लागतील. मंगळवारी हे सोनं १३,७३,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,९९० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१५,३७० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९,९०० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ११,५३,७०० रुपये मोजावे लागतील. सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीने देखील उच्चांक गाठला आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली असून ते खरेदी करण्यासाठी २६० रुपये मोजावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये १०००० रुपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदी करताना तुम्हाला आज २,६०,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

डायबेटीजच्या रुग्णांना मोठा दिलासा, आठवड्यातून फक्त एकदाच घ्या इन्सूलिन

मोठी बातमी! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, राज्यात खळबळ

शेतकऱ्याच्या मोबदल्यासाठी टोलजप्ती, जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT