Gold Silver Price Drop meta ai
बिझनेस

Gold Rate Today : आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ! 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?

Gold Silver Price Update : आठवड्याभरात सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झालीये. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत २४०६ रुपयांनी वाढ झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोनं-चांदीच्या किंमतीत आता पुन्हा वाढ होईल. मागच्या दोन दिवसात सराफा बाजारासोबत कमोडिटी मार्केटमध्येदी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. फक्त एका आठवड्यात सोनं २ हजारांपेक्षा जास्त तर चांदीच्या किंमतीत जवळपास २ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या दरात किती वाढ?

IBJA च्या आकडेवारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२३,८९३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. २७ नोव्हेंबरपर्यंत हा दर वाढून १,२६,२९९ रुपये झाला. म्हणजेच आठवड्याभरात सोन्याच्या किंमतीत २,४०६ रुपयांनी वाढ झाली. सध्या सोनं १.२५ लाखांच्या पुढे पोहोचलं आहे.

चांदीच्या दरातही तेजी

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही वाढ झाली. २० नोव्हेंबरला चांदीचा भाव १,५२,५२८ रुपये प्रति किलो होता. २७ नोव्हेंबरला तो वाढून १,५४,३०० रुपये प्रति किलो झाला. म्हणजेच आठवडाभरात चांदी १,७७२ रुपयांनी महागली आहे.

२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

IBJA च्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,७८९ रुपये प्रति १० ग्रॅम, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ९३,९८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

सोन्या-चांदीच्या दरात वाढ का होत आहे?

सोनं-चांदीच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. किंमतीत झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांकडून पुन्हा खरेदी सुरू झाली. तसेच अमेरिकन डॉलर कमकुवत होणं आणि अमेरिकन बाजारातली तेजी यामुळेही मौल्यवान धातूंच्या किंमतींना आधार मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महिला आरक्षणावर निलम गोऱ्हेंचा काँग्रेसवर निशाणा; ‘पक्षात ५० टक्के आरक्षण का दिलं नाही?’

Winter Skin Care: थंडीत त्वचा खूपच कोरडी पडतेय? आंघोळीपूर्वी करा फक्त 'हे' काम, स्किन राहील मऊ अन् मुलायम

Raj Thackeray: शरद पवार म्हणजे धक्कातंत्र, डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा निशाणा

Winter Farming : हिवाळ्यात शेतीतून मिळवा चांगले उत्पादन! डिसेंबर-जानेवारीत 'या' ६ पिकांची करा लागवड

हिवाळ्यात शेंगदाणे भिजवून की भाजून खावेत? जाणून घ्या कोणते अधिक फायदेशीर

SCROLL FOR NEXT