Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, २४ आणि २२ कॅरेटचे तुमच्या शहरातील आजचे भाव किती?

Gold Silver Price Hike: सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले होते. त्यामुळे अनेक महिलांनी सोनं खरेदीकडे भर दिला. पण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळा ८२० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे. तुम्ही देखील सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे दर किती आहेत हे जाणून घ्या.

गुडरिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ८२० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९८,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे. मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली होती. एक तोळा सोनं ९७,५८० रुपयांना मिळत होते. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. पण आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आज १० तोळे सोन्याच्या दरामध्ये ८,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्यासाठी तुम्हाला ९,८४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ७५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९२,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ६१० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७३,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम १०९ रुपये आणि प्रति किलोग्रॅम १,०९,००० रुपये इतकी झाली आहे.

मुंबई -

२४ कॅरेट - ९,८४० रुपये

२२ कॅरेट - ९,०२० रुपये

१८ कॅरेट - ७,३८० रुपये

चेन्नई-

२४ कॅरेट - ९,८४० रुपये

२२ कॅरेट - ९,०२० रुपये

१८ कॅरेट - ७,४१५ रुपये

दिल्ली -

२४ कॅरेट - ९,८५५ रुपये

२२ कॅरेट - ९,०३५ रुपये

१८ कॅरेट - ७,३९३ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

Couple Engagement : लोकप्रिय सिंगर ३५ व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात; साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर, होणारा नवरा कोण?

Manoj Jarange Patil: आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचे नाही; मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

Kumbha Rashi : गणेश कृपेने कुंभ राशीचे भाग्य खुलणार, नोकरीत पदोन्नतीची शक्यता

'मुंबईत मला गोळ्या घाला, मी बलिदान द्यायला तयार'; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

SCROLL FOR NEXT