GOLD PRICE DROPS TODAY: CHECK LATEST 24K, 22K & 18K GOLD RATES IN INDIA Saam Tv
बिझनेस

Gold Rate Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात ४,६९० रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

Gold Silver Price Weekly Update : देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोने ४,६९० रुपये, तर चांदी १५००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नईसह प्रमुख शहरांतील आजचे ताजे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • सोने चांदीच्या दरात आठवडा भरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४,६९० रुपयांनी घसरण

  • चांदीच्या दरात तब्बल १५००० प्रति किलोची घसरण

  • ग्राहकांना दिलासा

Weekly Gold Silver Price Rate Update News मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वधारले असताना, दुसरीकडे देशभरात सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईचा काळ आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली असून, चांदीच्या किमतीतही घट झाली आहे. सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सुवर्णसंधी ठरली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या दरात एका आठवड्यात तब्बल ४,६९० रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर २२ कॅरेट सोनेही ४,३०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ७ जून रोजी राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,९१० रुपये इतका नोंदवण्यात आला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४०,१५० रुपये आहे. यापूर्वी ५ जून रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ४०० रुपयांनी घसरून १,५९,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला होता.

मुंबई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४०,००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,७३० रुपये आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५४,९१० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४२,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. पुणे आणि बंगळुरूमध्येही मुंबईप्रमाणेच दर कायम आहेत.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची घट झाली. ७ जून रोजी सकाळी चांदीचा भाव २,६५,००० रुपये प्रति किलोग्रॅम होता. तर शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा दर ५,००० रुपयांनी घसरून २,६०,७०० रुपये प्रति किलोग्रॅमवर आला. पुढील काही दिवसांत बाजारातील परिस्थितीनुसार दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या नेत्यावर अहिल्यानगरमध्ये जमावाचा जीवघेणा हल्ला; १०० जणांवर गुन्हा दाखल

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे पक्ष सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यावर कायदेशीर कार्यवाही करणार

Nagpur Crime: राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाकडून महिलेचे लैंगिक शोषण, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग; नागपूर हादरले

Crime News: मैत्रीच्या धाग्याला रक्ताचा डाग! मित्रांमधील वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून

Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT