Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर ७०० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने कधी सोनं खरेदी करावं, अशा प्रश्न पडला आहे.

Siddhi Hande

सोनं पुन्हा महागलं

सोन्याचे दर ७०० रुपयांनी वाढले

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सोन्याचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. सोन्याच्या दरात सतत चढ उतार होत असल्याने खरेदीदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सोनं खरेदी करावं की नाही याबाबत त्यांना पडला आहे. सोन्याचे दर मध्येच वाढताना दिसत आहेत तर मध्येच घसरताना दिसत आहेत. त्यामुळे नेमकं कोणत्या वेळी सोनं खरेदी करावा असा प्रश्नच आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर वाढले आहेत.

काल सोन्याचे दर घसरले होते. त्यामुळे भविष्यात हे दर आणखी घसरतील असं वाटत होतं. मात्र, हे दर अचानक वाढल्याने पुन्हा खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज सोन्याचे दर ७०० रुपयांनी वाढले आहेत.

सोन्याचे दर वाढले

आज १४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,६२,३८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५६०रुपयांनी महागले असून १,२९,९०४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७००० रुपयांनी वाढले असून १६,२३,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,४८,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ५२० रुपयांनी महागलं असून हे दर १,१९,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी महागलं आहे.

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे ५३० रुपयांची वाढ झाली असून हे दर १,२१,७९० झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४२४ रुपयांनी वाढ असून हे दर ९७,४३२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ५,३०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १२,१७,९०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT