ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर उच्चांक गाठत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने मात्र यंदा दिवाळीत ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी कमी होईल, असं दिसत आहे. सोन्याचे दर आजही वाढले आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर किती ते वाचा.
आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,२८,८९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,०३,११२ रुपये आहेत. हे दर ४३२ रुपयांनी वाढले आहेत. तर १० तोळ्यामागे ५४०० रुपयांनी वाढ झाली आहे.हे दर सध्या १२,८८,९०० रुपये आहेत.
२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर सध्या १,१८,१५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९४,५२० रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ५००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर सध्या ११,८१,५०० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate )
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९६,९७० रुपये आहेत. या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅमच्या दरात ५६८ रुपयांनी वाढ होऊन हे दर ७७,५७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ७१०० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ९,६९,७०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.