Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण; १० तोळ्यामागे २३,४०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Fall: सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे जवळपास २,३४० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

आज खूप दिवसांनी सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सोनं चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचे दर घसरले होते. मात्र, या आठवड्यात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. दरम्यान, त्यानंतर आता खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. अनेक दिवसानंतर सोन्याचे दर घसरले आहेत. इराण-इस्त्रायल युद्ध थांबण्याचे संकेत मिळताच सोन्याच्या दरात वाढ झाली होती.मात्र, आज पुन्हा या दरात घसरण झाली होती.

सोन्याचे दर घसरले (Gold Price Fall Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,३४० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५१,४८० रुपये झाले आहे. तरीही सोन्याचे दर दीड लाखांच्या घरात आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,८७२ रुपयांनी घसरले असून हे दर १,२१,१८४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २३,४०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १५,१४,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate Today)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,१५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३८,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,७२० रुपयांनी घसरले असून १,११,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २१,५०० रुपयांची घसरण झाली होती. हे दर १३,८८,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर १,७६० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३६,६१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १४०८ रुपयांनी घसरले असून ९०,८८८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १७,६०० रुपयांची घसरण झाली असून हे दर ११,३६,१०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अर्ज मागे घेण्याची शक्यता

बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार, काँग्रेस अर्ज मागे घेणार? Inside story समोर

Bottle Cleaning Tips: फ्रिजमधल्या बाटल्या स्वच्छ कश्या करायच्या? या 3 सोप्या स्टेप्स

बीडमध्ये भीषण अपघातात तहसीलदाराचा जागीच मृत्यू, प्रशासकीय कर्मचार्‍यांवर शोककळा

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर किती? प्रति लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT