Gold Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold Price Drop Today: सोनं-चांदी खरेदीची आज सुवर्णसंधी आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. तर चांदीचे दर स्थिर आहेत.

Priya More
  • गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घसरण

  • १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर देखील घसरले

  • आज चांदीचे दर स्थिर आहेत

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. तर चांदीचे दर स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज गणेशभक्तांना सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ४९० रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ४९० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५४,०९० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांचीघसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,४०,००० रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी चांगली संधी आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ४५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,४१,२५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,५०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,१२,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे असतात. २२ कॅरेटच्या सोन्याचे दर घसरल्यामुळे आज तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करु शकता.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ३७० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१५,५७० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,५५,७०० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, आज सोन्याच्या दरात जरी मोठी घसरण झाली असली तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २४५ रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदी खरेदीसाठी २,४५,००० रुपये मोजावे लागतील. आज सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करण्याची ग्राहकांना चांगली संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT